‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे यातील कलाकारांना देखील सर्वांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली. आता यातीलच एक कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून बसवणारा अभिनेता ओंकार भोजने याने काही दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम सोडला. या कार्यक्रमातून मध्येच एक्झिट घेतल्याने त्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यानंतर आता लवकरच तो व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. या नाटकातून तो भाऊ कदमबरोबर स्टेज शेअर करताना दिसेल.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे भाऊ कदम. आता ते आणि ओंकार भोजने लवकरच ‘करून गेलो गाव’ या मालवणी नाटकामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘करून गेलो गाव’ या नाटकाला ही दोघं नव्याने रंगभूमीवर आणत आहेत. भाऊ कदम यांच्याप्रमाणेच ओंकार भोजनेच्याही विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. त्यामुळे या दोघांना स्टेजवर एकत्र काम करताना पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल.
या नाटकाची निर्मिती ही दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे करणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. आता ओंकार आणि भाऊ एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत.