‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता ओंकार राऊतलाही महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
ओंकार राऊतने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. ओंकारने मारुती सुझुकी कंपीनीची बलेनो ही गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर नव्या गाडीबरोबरचे फोटो ओंकारने शेअर केले आहेत. फोटोबरोबरच नव्या गाडीसाठी ओंकारने खास पोस्ट लिहिली आहे. ओंकारच्या या गाडीचं सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाशी खास कनेक्शन आहे. “२४/४/२०२३ला नवी baleno घरी आली,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> “कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…”, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका
“अक्षयतृतीयेला गाडी घेता आली नाही पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला ती घरी आली! (साडे तीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा ही देवाचाच दिवस!) सचिनच्या average एवढ, तिचं mileage असावं! सचिन च्या runs एवढे, तिचे kilometers व्हावे! सचिनच्या straight drive एवढी smooth तिची drive असावी!,” असंही पुढे ओंकारने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> २ हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलचं ट्वीट, मोदी सरकारवर टीका करत म्हणाला…
ओंकारच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ओंकारने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘काळे धंदे’ या वेब सीरिजमध्येही ओंकार झळकला होता.