छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. याच कार्यक्रमातून घराघरात पोहचेलेला कलाकार म्हणजे ओंकार राऊत. अभिनयाबरोबरच विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे ओंकारने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओंकार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. निरनिराळ्या पोस्टच्या माधमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. ओंकारने शेअर केलेली नवी पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीच्या भावाने खरेदी केला ट्रॅक्टर, वडिलांचा उल्लेख करत म्हणाली…
ओंकारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ओंकारच्या हातात एक गुलाबाचं फूल दिसत आहे. ओंकारने हा फोटो शेअर करत “कोणाला बरं द्यावं हे गुलाब?” असा प्रश्नही विचारला आहे. ओंकारची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
या फोटोवर हास्यजत्रेच्या कलाकरांसह अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. शिवाली परबने यावर कमेंट करत म्हणत आहे की, “मी सांगू का?” यावर प्रतिउत्तर देतं “सांग रे घाबरायचं काय!!!” असं म्हणत ओंकारने कमेंट केली आहे. तर शुभंकर तावडेने “लिस्ट पाठवू का?” असं म्हणत त्याची फिरकी घेतली आहे. तर काहींनी थेट प्रियदर्शनीचच नाव घेतलं आहे.
मध्यंतरी प्रियदर्शनी आणि ओंकार रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या वेळी ओंकार आणि प्रियदर्शनीने काढलेल्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. या फोटोमध्ये प्रियदर्शनीने ओंकारच्या छातीवर हात ठेवला होता त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचे तर्क चाहत्यांनी लावले होते.