महाराष्ट्रातील अनेकांची क्रश असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. छोट्या पडद्यापासून अभनिय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या प्राजक्ताने अल्पावधीत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्राजक्ता तिच्या आगामी व नवीन प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. याबरोबरच अनेक फोटोही प्राजक्ता शेअर करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टॉप परिधान करत वेस्टर्न लूक केला आहे. प्राजक्ताने फोटोसाठी विविध पोझही दिल्या आहेत.
प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरी फोटोसाठी दिलेल्या हटके पोझमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चाहत्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “प्राजू ही कुठली पोझ गं,” अशी एकाने कमेंट केली आहे. “सई ताम्हणकरबरोबर राहून तू पण विचित्र पोझमध्ये फोटो काढत आहेस प्राजू,” असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.
“हा कोणता खेळ आहे, आम्हाला पण सांगा” अशी कमेंटही केली आहे. “मुंबईला विकेट किपर पाहिजे”, असंही म्हटलं आहे.
“एफसी रोडवरुन कपडे खरेदी केल्यावर घरच्यांना दाखवताना प्राजू,” अशी कमेंटही केली आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकांबरोबरच प्राजक्ताने मराठी चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.