परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटातील कलाकार मंडळी जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या या कलाकारांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने अखेर नम्रता संभेरावचा चांगलाच बदला घेतला आहे. प्रसादने नम्रताबरोबर नेमकं काय केलं? त्याने तिचा बदला कसा घेतला? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी नम्रता संभेरावने प्रसादचा ऑस्ट्रेलियातील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये प्रसाद पेंगताना दिसत होता. “सॉरी, कँट्रोल नाही झालं पश्या. हा ऑडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ही पोस्ट करतेय. (btw हा व्हिडिओ jet lag मधला होता. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाचा आहे ) बाकी पश्याला आळस येत नाही, तो खूप उत्साही आहे. माझं काही खरं नाही”, असं लिहित नम्रताने प्रसादचा व्हिडीओ शेअर केला होता.

हेही वाचा – Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”

प्रसाद स्वतःचा मजेशीर व्हिडीओ पाहून भडकला होता. “रुको नम्रता. “इसका करारा जवाब मिलेगा…सबका बदला लैगा रे पश्या”, अशी व्हिडीओवर त्याने प्रतिक्रिया दिली होती. अखेर आज त्याने नम्रताचा चांगलाच बदला घेतला आहे.

प्रसादने नम्रताचा मजेशीर व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “झोपेच्या व्हिडिओसाठीचा हा करारा बदला घेतला गेला आहे. पण चांगल्या कारणासाठी ऑल द बेस्ट न(घु)मा. १ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात दणक्यात प्रदर्शित होतोय ‘नाच गं घुमा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहा.”

हेही वाचा – Video: पापाराझीचं ‘ते’ कृत्य पाहून भडकला रणबीर कपूर, व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संतापले, म्हणाले, “यांच्यासाठी कठोर…”

या व्हिडीओत प्रसाद म्हणतोय, “नमस्कार मंडळी. मी प्रसाद खांडेकर. संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाडक्या अभिनेत्रींचा म्हणजे नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वेचा यांचा ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित होतोय. हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या सगळे कलाकार व्यग्र आहेत. त्यातील एक कलाकार माझ्याबरोबर आज गाडीमध्ये आहे नमा म्हणजेच घुमा. हिने काही दिवसांपूर्वी माझा एक वेगळा व्हिडीओ शेअर केला होता. आता तुम्ही देखील तिला झोपताना बघा. किती क्यूट दिसते बघा. हा आळस नसून प्रमोशनसाठी सध्या धावपळ सुरू आहे. आता मी एका वेगळ्या प्रकारे तिला झोपेतून जागा करतोय.”

त्यानंतर प्रसाद ‘नाच गं घुमा’ हे गाणं लावतो. हे गाणं ऐकून नम्रता दचकून झोपेतून उठते. सुरुवातीला ती थोडी घाबरते पण नंतर ‘नाच गं घुमा’ची हूक स्टेप करते. असा हा मजेशीर व्हिडीओ प्रसादने नम्रताचा बदला म्हणून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसाद व नम्रताचा हा व्हिडीओ पाहून मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, स्वतः नम्रता संभेराव, भक्ती रत्नपारखी अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओत प्रसादची नवीन हेअरस्टाइल पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar avenged namrata sambherao shared her funny video pps