छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रसाद सगळ्यांना खळखळवून हसवतो. प्रसादने नुकतंच त्याच्या आईचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट लिहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रसाद खांडेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या आईच्या वाढदिवसाचे काही फोटोही पोस्ट केले आहे. प्रसाद खांडेकर दरवर्षी त्याच्या आईचा वाढदिवस १ जूनला साजरा करतो. यानिमित्तानेच त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Video : “…याचा अर्थ लक्ष नाही”, बारसू प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले “ते पत्र…”
प्रसाद खांडेकरची पोस्ट
Happy wala birthday आई
वाढदिवसाची नक्की डेट माहीत नसणाऱ्या करोडो लोकांचा घोषित वाढदिवस 1 जून ला साजरा होतो तसाच तुझा ही साजरा होतोय आई ….नक्की वय तुला ही सांगता येणार नाही ….आणि नकोच मोजूस …कारण मला अजून ही तू तशीच तरुण वाटतेस ….जशी मला माझ्या लहानपणी वाटायचीस …अजून ही रात्री शूट वरून प्रयोगावरून किती ही लेट होउदे …वाट बघत जागीच असतेस …..कधी कधी वैतागतो मी की का एवढ्या रात्री लेट पर्यंत वाट बघत जागी राहतेस …पण कधी चुकून तुझा फोन नाही आला तर मलाच चुकल्यासारख वाटत …आणि मग मीच फोन करून विचारतो फोन का नाही केलास आई …… बाबू जरा वजन कमी कर म्हणत दोन पोळ्या जास्तीच्या तूच वाढतेस ….भाताने शुगर वाढते बोलतेस पण मला आवडतो म्हणून थोडा तरी डाळभात बळेच खाऊ घालतेस .. सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात तसे मला ही माहीत आहेत पण श्लोक ज्यावेळी अल्पाच्या पोटात होता त्यावेळी तू माझ्यासाठी सोसलेल्या कष्टाची पुन्हा नव्याने जाणीव झाली. आई happy wala birthday तुला खुप खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप खुप पप्प्या, असे त्याने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
दरम्यान प्रसाद खांडेकरने त्याच्या आईला वाढदिवसाची भेट म्हणून स्मार्टफोन दिला आहे. त्याचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टवर हास्यजत्रेच्या कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.