‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो. प्रसाद सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याव्यतिरिक्त आपली परखड मत मांडत असतो. नुकताच प्रसाद नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विदेशात गेला आहे. याचे फोटो प्रसादने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा अमेरिका दौरा संपला. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दौऱ्याच्या वेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी कामासह मजा-मस्ती आणि भरपूर शॉपिंग केली. याचा फोटो चांगलाच चर्चेत आला होता.

हेही वाचा – Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ

अमेरिकेच्या दौऱ्यानंतर लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. २ डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे. अशातच सर्वांना खळखळून हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रसाद नेपाळला गेला आहे. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”

“नेपाळ बोलवतंय”, असं कॅप्शन लिहित प्रसाद खांडेकरने विमानतळावरील फोटो शेअर केले आहेत. तसंच नेपाळमधील देखील प्रसादने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, “भगवान बुद्धांचे जन्मस्थान नेपाळ.” नेपाळमध्ये चित्रीकरण होत असलेला प्रसादचा हा चित्रपट कोणता आहे? कधी प्रदर्शित होणार? अजून कोणते कलाकार पाहायला मिळणार? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

दरम्यान, गेल्या वर्षी प्रसाद खांडेकरने पहिल्यांदा दिग्दर्शित केलेला ‘एकदा येऊन तर बघा’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, वनिता खरात, रोहित माने अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. ८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या प्रसादच्या या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी हिट झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in nepal for movie shooting pps