लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या चारही भूमिका लीलया पेलणारा अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसाद घराघरात पोहोचला. आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. आता प्रसाद अभिनयाबरोबर लेखन, दिग्दर्शन या भूमिका उत्कृष्टरित्या सांभाळत नवनवीन विषय प्रेक्षकांच्या समोर घेऊन येताना दिसत आहेत. नुकतीच प्रसादने बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे; त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही प्रसाद सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतीच अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोसाठी खास पोस्ट केली आहे. प्रसादने बायको अल्पा खांडेकरबरोबरचे फोटो शेअर करून ही खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…

प्रसाद खांडेकरची खास पोस्ट वाचा…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको…बस तू आहेस बरोबर म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय…अजून खुप टप्पे पार करायचेत…जसं प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसंच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस
प्रेमाची ९ वर्ष आणि लग्नाची ११ वर्ष…एकूण २० वर्ष कशी गेलीत कळलं नाही.

मित्रामधून प्रियकर
प्रियकरमधून नवरा
नवऱ्यामधून बाप

एकांकिकेतून नाटकामध्ये
नाटकांमधून टेलिव्हिजनवर
टेलिव्हिजनवरून सिनेमात

चाळीतून वन रुम किचनमध्ये
वन रुम किचनमधून १ बीएचकेमध्ये
१ बीएचकेमधून २ बीएचकेमध्ये

बेस्ट बसमधून बजाज चेतक स्कूटरवर
बजाज चेतक स्कूटरवरून बजाज एव्हेंजर
एव्हेंजरवरून फोर व्हीलर कार

या आणि अशा कित्येक प्रवासात बरोबर राहिली आहेस…म्हणून इथंपर्यंत पोहोचलोय
आय लव्ह यू सो मच मिसेस खांडेकर….अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…अशीच बरोबर राहा आणि हसत राहा…अप्पू

हेही वाचा – अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”

प्रसाद खांडेकरने बायकोसाठी लिहिलेल्या खास पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याला आणि त्याच्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादची ही सुंदर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – “तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर

दरम्यान, प्रसाद खांडेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्याचं नवं नाटकं रंगभूमीवर येत आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ असं प्रसादच्या नव्या नाटकाचं नाव आहे. या नाटकाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसादने सांभाळली आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात प्रसादबरोबर शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेरावर पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader