छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रसाद सगळ्यांना खळखळवून हसवतो. प्रसादने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पत्नी अल्पाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. पत्नीसाठी प्रसादने खास पोस्ट लिहीत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. “बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…लेखकाला लिहिताना ब्लॉक येतो तस काहीसं ही पोस्ट लिहिताना होतंय…काय लिहू सुचत नाहीये कारण प्रेमाची नऊ वर्ष आणि लग्नाची नऊ वर्ष अशी साधारण १८ वर्ष आपली सोबतीची आहेत. पण ह्या १८ वर्षात पहिल्यांदा असं झालं की मी शूटिंगनिमित्त बाहेर असल्या कारणाने जवळ नाहीये…तुला पैठणी गिफ्ट देऊन जी चूक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न मी केला आहे”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>>लग्नाच्या दहा वर्षांनंतर राम चरण होणार बाबा, पोस्ट शेअर करत दिली गूड न्यूज
पुढे प्रसादने “’झी कॉमेडी अवॉर्डस’मध्ये ह्या वर्षी मला नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा पुरस्कार मिळाला. पण तो घोषित व्हायच्या आधी १५ सेकंदात सर्रकन भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला…पुरस्कार जाहीर होण्याआधी मी तुझा हाथ हातात घेण्यासाठी पकडायला गेलो तर दोन्ही हातांच्या बोटांचे क्रॉस करून प्रार्थना करत होतीस. त्याचवेळी आयुष्यातील पहिल्या एकांकिकेला मिळालेल्या पुरस्काराची आठवण झाली. त्यावेळी सुद्धा माझ्या बाजूला बसून अशीच बोट क्रॉस करून बसली होतीस”.
हेही वाचा>> ‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींचा व्हिडीओ समोर
हेही वाचा>> “मला गरोदरपणाची…” राम चरणच्या पत्नीने आई होण्याबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत
“सांगायचं एवढंच आहे की, कॉलेजला असताना आयुष्यात आलीस तेव्हापासून पदोपदी साथ दिली आहेस…असाच आयुष्यभर सांभाळ कर…आता तर मी आणि श्लोक दोन दोन बाळांना सांभाळावं लागतंय तुला….बाकी तुला तर माहिती आहे माझं केवढं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आणि जे मी नेहमी म्हणतो तू आहेस म्हणून मी आहे आणि सर्वकाही आहे”, असं म्हणत प्रसादने पत्नीबद्दलचं प्रेम पोस्टद्वारे व्यक्त केलं आहे.