‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो चर्चेत असतो. नुकतीच प्रसादने आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेता प्रसाद खांडेकरच्या आईचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने आईबरोबरचे खास क्षणाचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे. प्रसादने लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तू जे काही केलं आहेस आणि जे काही करते आहेस त्याची परतफेड या जन्मात काय कोणत्याच जन्मात करू शकत नाही…तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा देवाकडे माझ्यासाठीच एक मागण मागेन की प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे…आय लव्ह यू आई…माझा आणि आमच्या सगळ्यांचाच तुझ्यावर खूप जीव आहे.”
या पोस्टनंतर प्रसादने आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यामधून आईचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला, हे चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. “आईचं बड्डे सेलिब्रेशन…आईचा बड्डे आईचा बड्डे आईचा बड्डे…टाणा ना ना ना (कृपया भाईचा बड्डे या चालीवर वाचावं)”, असं कॅप्शन देत त्याने आईच्या वाढदिवसातील खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ‘आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ लिहिलेला सुंदर केक दिसत आहे. तसंच प्रसादने आईला साडी वगैरे गिफ्ट म्हणून दिलं आहे. सहकुटुंब सहपरिवार येऊन प्रसादने आईचा वाढदिवस साजरा केल्याचं फोटोमधून पाहायला मिळत आहे. प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याच्या आईला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा दुबई दौरा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रसाद आईचा वाढदिवस साजरा करून दुबईला रवाना झाला. याचे फोटो त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्यामुळे आता प्रसादसह दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, इशा डे, प्रभाकर मोरे, चेतना भट, नम्रता संभेराव, समीर चौघुले, ओंकार राऊत अशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम दुबईकरांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. आज दुबईतील शेख राशिद थिएटरमध्ये पहिला शो पार पडणार आहे.