‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे यांनाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने नुकतंच ‘एबीपी वाहिनी’च्या ‘माझा कट्टा’मध्ये हजेरी लावली. प्रसाद आणि गौरव मोरेसह हास्यजत्रेतील रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप हे विनोदवीरही उपस्थित होते. लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनीही हजेरी लावली. या मुलाखतीत हास्यजत्रेच्या पडद्यामागचे अनेक किस्से विनोदवीरांनी शेअर केले. यावेळी हास्यजत्रेतील विनोदवीर कसे सापडले, याबद्दलही मोटे आणि गोस्वामी यांनी सांगितले.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
Gautam Gambhir Statement on Ricky Ponting Over Virat Kohli Rohit Sharma Criticism Said What does Ponting to has to do with Indian cricket
Gautam Gambhir: “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने तर…”; रोहित-विराटबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीर संतापला
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हेही वाचा >> दिवाळीत होळी साजरी करतेय विराट कोहलीची लेक, वामिकाचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली…

प्रसाद खांडेकर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पहिल्यापासूनच काम करत होता. परंतु, गौरव मोरेने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या. हास्यजत्रेच्या पहिल्या ऑडिशनसाठी गौरव आणि प्रसाद एकत्र गेले होते. यावेळी प्रसाद त्याला “तुझं सिलेक्शन झालं पाहिजे. माझा कल जास्त दिग्दर्शन आणि लेखन याकडे आहे”, असं म्हणाला होता. “गौरवला सचिन मोटे सर ओळखत होते. त्यामुळे तुझं सिलेक्शन होणार, असं मी त्याला म्हणालो होतो”, असंही प्रसादने सांगितलं. परंतु, ऑडिशन दिल्यानंतर प्रसादची निवड झाली. त्यानंतर गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिले. त्यातील एका ऑडिशनमध्ये त्याचं सिलेक्शन झालं.

हेही वाचा >> “विमानात बसल्यानंतर भरत जाधवने…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने सांगितला गौरव मोरेचा लंडनमधील इंग्रजी भाषेचा भन्नाट किस्सा

गौरव त्याच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. नुकताच तो लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. याआधी तो ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता. प्रसाद खांडेकरही ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांची फौज दिसणार आहे.