छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मागील कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत, त्याप्रमाणे या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
सध्या या कार्यक्रमाच्या टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार ऑस्ट्रेलियातून अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच सध्या प्राजक्ता माळी व पृथ्वीक प्रतापच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रतापने प्राजक्ता माळीबरोबरचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्राजक्ता पृथ्वीकचा हात पकडते आणि मग दोघं एकत्र चालताना दिसत आहेत. या व्हिडीओमागे शाहरुख खानचं ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं हे’ गाणं लावलं आहे.
प्राजक्ता व पृथ्वीकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मला फक्त त्रास होतोय हा रील पहिल्यापासून.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “एक पॅकेट फरसाण गिफ्ट म्हणून दिल्यावर प्राजक्ता.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पृथ्वीक तू असं नको वागू.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मग कर्जतचं फार्म हाऊस तुझा झाला असं समजायचं का?” अशा अनेक मजेशीर कमेंट्स प्राजक्ता व पृथ्वीकच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: किली पॉलने गायलं ‘गुलाबी साडी’ गाणं, मराठी ऐकून थक्क झाले नेटकरी, म्हणाले, “महाराष्ट्रात ये…”
दरम्यान, याआधी पृथ्वीक व ओंकार राऊतचा ऑस्ट्रेलियातला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या बीचवर धमाल-मस्ती करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.