बादशाह, किंग ऑफ बॉलीवूड, किंग खान, एसआरके अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला शाहरुख खानने काल (गुरुवारी) ५८वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनी काल मध्यरात्रीपासून संपूर्ण २ नोव्हेंबरचा दिवस आपापल्या पद्धतीने किंग खानचा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील एका अभिनेत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. हा अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता आहे.

हेही वाचा – वरुण तेज व लावण्या त्रिपाठी इटलीमध्ये अडकले लग्नबंधनात, शाही सोहळ्याचे फोटो-व्हिडीओ आले समोर

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Story About Manavat Murder Case
Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meeting Claims VBA
Politics : “देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि..”, वंचित बहुजन आघाडीचा दावा
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
one leader one election in name of nation whatever is going on today is not a nation
नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत
Renew company Vijay wadettiwar
विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण, रिन्यू कंपनीची महाराष्ट्रातच गुंतवणूक
Govind Bagh, Baramati, Sharad Pawar,
बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील या अभिनेत्याने याआधी शाहरुखचा मोठा चाहता असल्याकारणाने अनेक गोष्टी केल्या आहेत. जसं की ‘जवान’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याने चित्रपटातील शाहरुखचा टक्कल लूक हुबेहुब केला होता. या लूकमध्ये ‘बेकरार करके हमे..’ गाण्यावर डान्स केला होता. शिवाय ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावरही या अभिनेत्याने जबरदस्त डान्स केला होता. आता काही जणांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील हा अभिनेता कोण आहे? हे ओळखलं असेल. हा अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. हो, शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या या मोठ्या चाहत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. पृथ्वीकने स्वतःचं हक्काचं घरं घेतलं आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पृथ्वीकने नव्या घराच्या बाहेरील फोटो शेअर करत लिहीलं आहे, “आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा, पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं…”

“आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरू राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…! गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही,” असं पृथ्वीक लिहीलं आहे.

हेही वाचा – Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी

पृथ्वीकच्या नव्या घराची बातमी ऐकून कलाकार मंडळीसह चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रथमेश परब, चेतन वडनेरे, अक्षर केळकर, निखिल बने, अश्विनी कासार, स्वानंदी टिकेकर, ऋतुजा बागवे, रुचा आपटे, सुयश टिळक, आर्या आंबेकर अशा अनेक कलाकार मंडळींनी पृथ्वीकला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, पृथ्वीक पूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसाद खांडेकरने नव्या घरात गृहप्रवेश केला होता. “नवीन घर…अजून एक स्वप्न पूर्ण…घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं…त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!” असं लिहीत प्रसादने नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.