अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाने त्याला वेगळी ओळख दिली. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. तर आता नुकताच त्याच्या पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रताप चाहतावर्ग मोठा आहे. पृथ्वीकही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याचे चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडिया वरून मुलाखतींमधून तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, त्याला आलेले अनुभव मोकळेपणाने चाहत्यांशी शेअर करत असतो. तर आता त्याने पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं याचा खुलासा केला आहे.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मला करायचं होतं पण मी केलं नव्हतं. पण माझ्या वर्गातल्या माझ्या एका मैत्रिणीला माझ्या वतीने माझ्या मित्राने प्रपोज केलं होतं.” तर आता पृथ्वीकचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.