‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा पृथ्वीक प्रताप नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियावर पृथ्वीकचे मजेशीर व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. काही महिन्यांपूर्वी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. २५ ऑक्टोबरला अभिनेत्याने प्राजक्ता वायकूळ हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीक आणि प्राजक्ताचं नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता दोघांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पृथ्वीकने पत्नीसाठी अनोख्या अंदाजात पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकूळ ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकत्र नाटक, एकांकिकामध्ये काम केलं आहे. यावेळीच पृथ्वीकची प्राजक्ताशी ओळख झाली. प्राजक्ताला अभिनयाची खूप आवड होती. पण नंतर दोघांपैकी एकाला करिअरमध्ये यश मिळण्यासाठी प्राजक्ताने अभिनय क्षेत्र सोडलं. आता ती अ‍ॅडमिन म्हणून काम करत आहे. आज प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्ताने पृथ्वीकने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – Year Ender 2024: ऑस्कर ते कान, गोळीबार ते जेल; वाचा २०२४मधील सिनेसृष्टीतील टॉप-११ बातम्या

अभिनेता पृथ्वीक प्रतापने एक व्हिडीओ शेअर केला आहे. गर्लफ्रेंड ते बायको होण्यापर्यंतचा प्रवास त्याने फोटोंच्या माध्यमातून दाखवला आहे. या व्हिडीओवर एक सुंदर मेसेज लिहिला आहे की, हे कधीच गंतव्यस्थान नसतं तर हा तुमचा नेहमीचा प्रवास असतो. हा व्हिडीओ शेअर करत पृथ्वीकने प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “हॅप्पी बर्थडे पी…तुझं ३०व्या वर्षात स्वागत आहे.”

हेही वाचा – वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ची निराशाजनक कामगिरी, १८० कोटी बजेट असलेल्या सिनेमाने ३ दिवसांत कमावले फक्त…

पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोग, प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीकची ही पोस्ट सध्या व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – “Six Plus…”, रेश्मा शिंदेच्या साऊथ इंडियन नवऱ्याने लग्नात घेतला इंग्रजीत हटके उखाणा! व्हिडीओ आला समोर

दरम्यान, पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकूळने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. साधेपणाने लग्न करण्यामागे दोघांचा एक हेतू होता; जो लग्नानंतर समोर आला होता. पृथ्वीक म्हणाला होता की, मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे, असं आम्हाला वाटतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap share special post for wife prajakta on her birthday pps