‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. १४ ऑगस्टला हास्यजत्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित मराठी कलाकारांना लोकप्रियता मिळाली. शिवाली परब, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत हे कलाकार हास्यजत्रेमुळे घराघरांत पोहोचले. अशाच एका महाराष्ट्राच्या जनतेला खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या कॉलेजच्या जीवनांतील आठवणींना उजाळा देत खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘ही’ आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री, शाहरुख-सलमानपेक्षाही कमावते जास्त पैसा, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
Kiran Mane
किरण मानेंनी शेअर केला प्रिया बेर्डेंचा जुना व्हिडीओ; म्हणाले, “एका सुपरस्टारच्या पत्नीने…”
adinath kothare
आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो पोस्ट करत सांगितलं चित्रपटाचं नाव
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”

अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो कॉलेजच्या ग्रुपसह मजा-मस्ती करताना दिसत आहे. पहिला फोटो मरीन ड्राईव्हजवळचा आहे. तर, पुढच्या काही फोटोंमध्ये कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या आठवणी, साडी आणि टाय डे, महाविद्यालयीन नाटकादरम्यानचे फोटो दिसत आहेत.

हेही वाचा : Independence Day 2023: “माझा देश चिरायू होवो”, केदार शिंदे ते सई ताम्हणकर; मराठी कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

‘हास्यजत्रे’मुळे हा मराठमोळा अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला आणि आज महाराष्ट्राच्या घराघरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून पृथ्वीक प्रताप आहे. पृथ्वीकने आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जवळच्या मित्रांना टॅग करत “आपण एकत्र स्वप्न पाहिली आणि आज एकत्र मोठे झालो” असे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीकचे कॉलेजच्या दिवसांतील अनेक मित्र आज त्याच्यासह मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. रोनक शिंदे (सावली होईन सुखाची), रोहित माने, चेतन गुरव आणि प्रशांत केणी हे पृथ्वीकचे मित्रही आज छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम करत आहेत.

हेही वाचा : Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एल्विश यादव ठरला विजेता!

पृथ्वीक प्रतापचा जुना न ओळखता येणारा लूक पाहून अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. शिवाली परबने “कसला कमाल आहे हे…” असे म्हटले आहे. प्रियदर्शनी इंदलकरने यावर “गोल्स…” अशी कमेंट केली आहे. तर वनिता खरात आणि स्वानंदी टिकेकर यांनी कमेंट्मध्ये हार्ट इमोजी जोडले आहेत.

Story img Loader