Prithvik Pratap Wife Prajakta Vaikul Education: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप २५ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकला. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी कोर्ट मॅरेज केलं. पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वीक व प्राजक्ता ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी २५ ऑक्टोबर रोजी साधेपणाने लग्न केलं. लग्नातील खर्च ते दोन मुलांच्या शिक्षणावर करणार आहेत. पृथ्वीकचे लग्न झाल्यापासून त्याची पत्नी प्राजक्ता कोण आहे, काय करते याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. आता पृथ्वीक व प्राजक्ता यांनी एका मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. तसेच प्राजक्ताने ती कोणत्या क्षेत्रात काम करते, त्याची माहिती दिली.

पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?

प्राजक्ता वायकूळ काय करते?

प्राजक्ता वायकूळ एचआर आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी ९ वर्षांपासून नोकरी करते. सुरुवातीला दोन-अडीच वर्षे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत होते, त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये आले. आता मी अॅडमिन म्हणून काम करते.” प्राजक्ताने एमबीए केलं आहे.

अभिनयाची होती आवड

प्राजक्ताला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना अभिनय करायचे. प्राजक्ताने प्रसाद खांडेकरच्या ग्रुपबरोबर काम केलं आहे. या ग्रुपबरोबर काम करतानाच पृथ्वीक व प्राजक्ताची ओळख झाली. पृथ्वीकने तिला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. त्यानंतर जवळपास ११ वर्षे ते रिलेशनशिपमध्ये राहिले आणि आता लग्न केलं.

‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”

आंतरराष्ट्रीय चित्रपटात प्राजक्ताने केलंय काम

पृथ्वीकने याच मुलाखतीत पत्नी प्राजक्ताचं कौतुक केलं. प्राजक्ताने एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम केलं आहे. पृथ्वीक म्हणाला, “तुम्हाला खोटं वाटेल पण सगळ्यांचा रिसर्च कमी पडला आहे. कारण प्राजक्ताने २०१२ य मुलीने आंतरराष्ट्रीय चित्रपट केला आहे. ‘रेड गोल्ड’ असे या चित्रपटाचे नाव आहे.”

पृथ्वीक प्रताप व प्राजक्ता वायकूळ (फोटो – इन्स्टाग्राम)

तब्बल ११ वर्षांचं प्रेम, प्राजक्ताची साथ ते लग्न! पृथ्वीक प्रतापने लग्नाबद्दल स्वत:च केला खुलासा; म्हणाला, “२०१३ पासून…”

प्राजक्ताने अभिनयश्रेत्र का सोडलं?

पृथ्वीक म्हणाला, “आम्ही एकत्र काम करत होतो. प्राजक्ता नाटकं, एकांकिका करत होतं. एका नावाजलेल्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर काम करत होती. ती दिसायला उजवी आहे. त्यामुळे करिअरमध्ये तिचं सगळं छान असू शकलं असतं, असं असताना एकेदिवशी प्राजक्ता एक निर्णय घेते. ती मला येऊन सांगते, ‘मला वाटतं मी थांबायला हवं’. मी विचारलं की कशात? तर ती म्हणाली, ‘आपण दोघेही एकत्र संघर्ष करणार, दोघांपैकी एकालाही यश नाही मिळालं तर काय करणार’. मी म्हटलं आपण आणखी प्रयत्न करणार. ती म्हणाली, ‘त्यापेक्षा आपण असं करू की आपल्यापैकी एकाने सेटल होऊ आणि दुसऱ्याचा स्ट्रगल सोपा करूयात. मला वाटतं मी थांबायला हवं. कारण तू चांगलं काम करतोस.”‘

प्राजक्ता म्हणाली, “मी त्याला काम करताना पाहिलंय, त्यामुळे तिचं पॅशन वेगळ्या लेव्हलचं आहे. मला तितकं शक्य नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap wife prajakta vaikul education career film softnews hrc