‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहे. अभिनेता ओंकार राऊत आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हेदेखील या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झाले. काही महिन्यांपूर्वी प्रियदर्शनीने ओंकारबरोबरचा एक गोड फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर प्रियदर्शनीने यावर उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी (२२ मार्च) प्रदर्शित झाला. या निमित्ताने तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. यावेळी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनीला ओंकारबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने हे सर्व आस्ताद काळेच्या कमेंटमुळे झालं, असे म्हटले.
आणखी वाचा : “ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहतोय…” आस्ताद काळेच्या कमेंटने वेधलं लक्ष, ‘हास्यजत्रे’तील अभिनेत्री म्हणाली “काय तुम्ही…”

“मला त्यावेळी चर्चा होण्यासारखा काही तरी कंटेट दिला आहे, याचीच मला कल्पना नव्हती. याची इतकी चर्चा होईल, हेच मला माहिती नव्हते. तसेच माझ्या आयुष्यात काय घडतंय याबद्दल लोकांना इतका फरक पडतोय हेच महत्त्वाचं आहे.” असे ती म्हणाली.

“आस्ताद काळेने केलेल्या कमेंटमुळे सर्व न्यूज पोर्टलने एकदम ती बातमी केली. त्यानंतरच या चर्चा झाल्या”, असेही प्रियदर्शनीने म्हटले.

आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

प्रियदर्शनीने शेअर केलेला तो फोटो अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नादरम्यानचा होता. वनिताच्या लग्नसोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे बरेच फोटोही व्हायरल झाले. पण प्रियदर्शनी आणि ओंकारच्या फोटोची विशेष चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar talk about relationship rumore with onkar raut said astad kale nrp