Priyadarshini Indalkar and Onkar raut : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रियदर्शिनी इंदलकर आणि ओंकार राऊत यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कलाकार जोडी-जोडीने ‘चल जाऊ डेटवर’ या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. यामागे खूपच खास कारण आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या दोन्ही परीक्षकांसह ईशा डे आणि समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. या सिनेमातील ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सई आणि समीर यांच्या याच गाण्यावर प्रियदर्शिनी इंदलकर आणि ओंकार राऊत यांनी जबरदस्त डान्स केला आहे. ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.

प्रियदर्शिनी आणि ओंकार यांची जोडी पहिल्यापासूनच प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे ‘चल जाऊ डेटवर’ या गाण्यावर दोघांना डान्स करताना पाहून चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्रियदर्शिनी आणि ओंकार यांच्याप्रमाणे याआधी या भन्नाट गाण्यावर शिवाली-निखिल, वनिता-लाडका दादूस, पृथ्वीक-रसिका हे कलाकार देखील थिरकले आहेत.

Priyadarshini Indalkar and Onkar raut
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Priyadarshini Indalkar and Onkar raut )

दरम्यान, सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सई-समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १ मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे.