छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमी सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसंच तिच्या कामाविषयी चाहत्यांना सांगत असते. नुकतीच प्रियदर्शिनीने एका अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरने खास पोस्ट अभिनेत्री आरती मोरेसाठी लिहिली आहे. सध्या प्रियदर्शिनी आणि आरती ‘विषामृत’ नावाच्या नाटकात एकत्र काम करत आहेत. याच नाटकासाठी आरतीला ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’मध्ये सहाय्यक भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. त्यानिमित्ताने प्रियदर्शिनीने आरती मोरेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
प्रियदर्शिनीने आरतीबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं, “नेहमी इच्छा होती, एकत्र राहायला लागल्यापासून…हिच्याबरोबर कधीतरी काम करता यावं…तुझ्याबद्दलचं जे जे कौतुक ऐकिवात होतं…ते तुझ्याबरोबर काम करताना खूप जवळून अनुभवलं. किती बारीक बारीक गोष्टींवर काम करतेस…सतत करत राहतेस.”
पुढे प्रियदर्शिनी इंदलकरने लिहिलं, “नाटकावरचं तुझं प्रेम, तुझ्या वावरातुन दिसत राहतं..राणीचं पात्र तू ज्या पद्धतीने उभं केलयंस, ते अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे. तू खूप गोष्टींसाठी पात्र आहेस, आरती…आणि तुझ्या प्रवासाचा भाग होता आलं याचं मला समाधान आहे. रुममेट्स ते मैत्री ते आता सहकलाकार…’झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’मध्ये तुला विषामृत या नाटकातील सहाय्यक भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळाल्याबद्दल अभिनंदन.”
दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या ‘विषामृत’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या नाटकात तिच्याबरोबर अभिनेता शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहे. तसंच काही दिवसांपूर्वी प्रियदर्शिनीचा ‘रुखवत’ नावाचा चित्रपट ‘अल्ट्रा झक्कास मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत झळकला आहे. याशिवाय प्रियदर्शिनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातही पाहायला मिळत आहे.