‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सगळे कलाकार अलीकडेच प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. राज्यासह आपल्या देशभरात‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमेरिकेत काही निवडक प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. याकरता सगळे कलाकार गेले २३ दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर होते.
हेही वाचा : “करिअर कर पण…”; अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वंदना गुप्तेंना त्यांच्या आईने दिलेला ‘हा’ महत्वाचा सल्ला
परदेशात हास्यजत्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून प्रत्येक कलाकार भारावून गेला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम आणि परदेशातील प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदरकरने खास व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : फेक ऑडिशनच्या जाळ्यात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री; स्वत: खुलासा करत म्हणाली, “आतल्या खोलीत नेलं अन्…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यूएसए आणि कॅनडा दौरा २०२३ असे व्हिडीओला कॅप्शन देत प्रियदर्शनी लिहिते, “२३ दिवस, ११ प्रयोग, ९ राज्ये, ११ शहरे, २ देश आणि हजारो प्रेक्षकांचे प्रेम…मी खरंच खूप भाग्यवान आहे. आमच्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कुटुंब एवढे मोठे असेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अमिक फाळके, ५ डि डायमेन्शन, सोनी मराठी, प्रमोद पाटील, यतिन पाटील तुमच्या शिवाय हे शक्य नव्हते.”
हेही वाचा : तमन्ना भाटियाकडे आहे जगातील पाचवा मोठा हिरा? अभिनेत्रीने सांगितलं सत्य म्हणाली….
प्रियदर्शनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती व्हिलचेअरवर बसलेली दिसत आहे याबद्दल अभिनेत्री लिहिते, “मला एका शोला बरे नव्हते. फूड पॉयजनचा त्रास झाला होता. त्यामुळे अमित फाळके यांनी मला विमानतळ ते पुढच्या प्रयोगाचे ठिकाण व्हिलचेअरवर ओढत नेले.”
दरम्यान, प्रियदर्शनीने प्रत्येक प्रयोग संपन्न झालेल्या शहरांची नावे या व्हिडीओमध्ये नमूद केली आहेत. टॅंपा, ॲटलॉंटा, बॉस्टन, न्यू जर्सी, टोरंटो, वॉश्टिंगटन डिसी, दल्लास, व्हँकुव्हर, सिएटल, सॅन जोस आणि सॅन दिएगो या ११ शहरांमध्ये ११ प्रयोग घेण्यात आले. हे सगळे प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. लवकरच छोट्या पडद्यावर हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.