छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे. या शोमधील हास्यवीर प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतात. याच शोमधून विनोदवीर समीर चौगुले घराघरात पोहोचले. त्यांचे स्किटमधील डायलॉगही प्रेक्षकांच्या तोंडपाठ असतात. अनेकदा त्यावरुन मीम्सही बनवले जातात.
समीर चौगुलेंच्या स्किटमधील एका डायलॉगवर असाच एक हटके मीम चाहत्याने शेअर केला आहे. या मीममध्ये चाहत्याने समीर चौगुलेंना चक्क स्पायडरमॅन बनवलं आहे. हास्यजत्रेच्या स्किटमधील चौगुलेंच्या डायलॉगचा वापर करुन हे मीम तयार करण्यात आलं आहे. “कुणी मला सांगेल का अॅव्हेंजर्स म्हणजे काय? हममम…काय अॅव्हेंजर्स म्हणजे काय रसिकहो” असा डायलॉग मीममध्ये वापरण्यात आला आहे. ‘सुपर हिरो मीमकर’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा मीम शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>>…अन् मानसी नाईकच्या नवऱ्याला कॅमेऱ्यासमोरचं कोसळलं रडू, प्रदीप खरेराने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
चाहत्याने शेअर केलेला हा मीम पाहून समीर चौगुलेंनाही हसू अनावर झाल्याचं दिसत आहे. चौगुलेंनी या मीमवर कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “हाहा…हे खूपच मस्त आहे…खूप सारं प्रेम” अशी कमेंट चौगुलेंनी केली आहे. समीर चौगुलेंच्या डायलॉगवरील हा मीम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे.
हेही वाचा>> ‘बेशरम रंग’ वादाच्या भोवऱ्यात असताना शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज, लवकरच होणार बाबा
समीर चौगुले एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. आपल्या अफलातून विनोदी अभिनय शैलीने ते प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. त्यांनी मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. समीर चौगुलेंचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.