छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. समीर चौघुलेंनी नुकतंच त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समीर चौघुले यांची पत्नी कविता चौघुले यांचा आज वाढदिवस आहे. याच वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीबरोबरचा एक गोड फोटोही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

समीर चौघुलेंची खास पोस्ट

“कविता चौघुले वाढदिवसाच्या शुभेच्छा…तूच माझं असणं नि तूच माझं जगणं….तूच धेय्य नि तूच कारण….कॉलेजपासून आपण एकत्र आहोत.. माझ्या स्वप्नांचा पाठलाग माझ्यापेक्षा तूच केलास. माझ्या प्रत्येक नैराश्याला डोळे वटारून तू पळवून लावलस … कोणत्याही कलाकाराच्या स्ट्रगलच्या काळात शांतपणे विश्वासाने “मी आहे” म्हणणारी व्यक्ती पाठीशी असणे खूप गरजेचे असते.

माझ्या पाठीशी तर आयुष्याच्या प्रत्येक आडवळणावर धडे देणारी कविता आहे..मदर्स डेच्या दिवशीच तुझा वाढदिवस येणे हा काही योगायोग नसावा….कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याशिवाय, त्यागाशिवाय कोणताही कलाकार घडू शकत नाही….तुला मी काय देणार. तूच मला इतकं दिलंयस ….हो पण आसमंतात मावणार नाही इतकं प्रेम मात्र नक्की देतो…वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…..खूप प्रेम…”, असे समीर चौघुले या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

दरम्यान समीर चौघुलेंच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने “वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता”, अशी कमेंट या पोस्टवर केली आहे. तर अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने “कविता ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.