‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेते समीर चौघुले घराघरांत पोहोचले. अभिनय आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हास्यजत्रा कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कलाकारांचं एकमेकांशी घट्ट नातं आहे. हे कलाकार एकमेकांचे किस्से, विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या समीर चौघुलेंनी शेअर केलेला असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : “मला संजना दिल्याबद्दल…”, ‘आई कुठे काय करते’चे १ हजार भाग पूर्ण, रुपाली भोसलेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
young Chennai photographer was cheated for 13 lakh after being lured for shoot in Pune and Goa
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
Maharashtrachi Hasyajatra Fame Namrata Sambherao-Sanjay Narvekar this photo find out which movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव-संजय नार्वेकर यांचा ‘हा’ फोटो कोणत्या चित्रपटातील आहे? ओळखा पाहू
Pirticha Vanva Uri Petla fame Indraneil Kamat meet tejashri Pradhan photo viral
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम इंद्रनील कामतची तेजश्री प्रधानबरोबर ग्रेट भेट, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला, “तू खूप दयाळू…”

समीर चौघुले यांनी हास्यजत्रेच्या सेटवरील खास फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका अभिनेत्यासह फोटो शेअर करून त्यांनी “आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण…” असे कॅप्शन देत पुढे नवीन एन्ट्री, पदार्पण, महाराष्ट्राची हास्यजत्रा असे टॅग्ज दिले आहेत. हा अभिनेता कोण आहे? जाणून घेऊया…

हेही वाचा : ‘बापल्योक’मधील ‘उमगाया बाप रं’ गाण्यात ‘तो’ शब्द आला अन् अजय गोगावले…; संगीतकार किस्सा सांगत म्हणाले…

समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये विनोदवीर गौरव मोरे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. गौरवने या फोटोमध्ये केस कापल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नव्या लूकमध्ये या विनोदवीराला ओळखणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : ‘गदर २’ पाहिल्यानंतर हेमा मालिनींनी केलं कौतुक; सनी देओलने सावत्र आईचा फोटो केला शेअर

अभिनेत्री नम्रता संभेरावने “समीर चौघुलेंनी दिली आनंदाची बातमी… त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क” अशी प्रतिक्रिया फोटोवर दिली आहे.

तसेच अन्य नेटकऱ्यांनी “देवा देवा, गळ्याने केस कापला”, “अरे! गौरव सरांच्या केसाला काय झालं?”, “MHJ team असताना गौरवच्या केसाला धक्का कोणी लावला?” अशा मजेशीर कमेंट्स या फोटोवर केल्या आहेत. दरम्यान, गौरव मोरेने हा लूक का केला? हा लूक स्किटसाठी आहे का? याचे उत्तर हास्यजत्रेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना मिळेल.

Story img Loader