अभिनेत्री शिवाली परब ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. शिवालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. शिवाली ही काही दिवसांपूर्वी ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात झळकली. आता या चित्रपटासाठी तिला पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवाली परब ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने तिला मिळालेल्या एका पुरस्कारबद्दल सांगितले आहे. शिवालीला ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे.
आणखी वाचा : ‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण, सुबोध भावेने शेअर केला खास फोटो, म्हणाला “आज…”

शिवाली परबची पोस्ट

“… आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट विभाग…
~ शिवाली परब ~( प्रेम प्रथा धुमशान )

माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला मिळालेल हे पारितोषिक. धन्यवाद, ज्यांनी मला इतक प्रेम दिलं”, असे शिवाली परबने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान शिवाली परब मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातून गावातील थरारक प्रेमकथेवर आधारित होती. या चित्रपटात शिवाली मालवणी भाषा बोलताना दिसत आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज दिसली होती.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात शिवालीसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारही झळकले होते. या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे.