‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं आहे. विदेशातील दौरे झाल्यानंतर २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमातील कलाकार चर्चेत आले आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या म्हणजेच अभिनेता रोहित मानेचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्याने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे? पण, रोहित माने असं का म्हणाला? जाणून घ्या…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना नवी ओळख मिळाली असून ते रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोहित माने.
हेही वाचा – करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
अलीकडेच रोहितने हास्यजत्रेमधील कलाकारांबरोबर ‘प्लॅनेट मराठी’ या एंटरटेनमेंट न्यूज चॅनेलशी संवाद साधला. यावेळी शिवाली परबला उपस्थितीत असलेल्या कलाकारांची कार्टुनबरोबर तुलना करायला सांगितलं. तेव्हा शिवाली म्हणाली, “सावत्या म्हणजे माझ्यासाठी शिजुका आहे. कारण मी कॉलेजमध्ये असताना तो नाटक वगैरे करायचा. मी त्याला बघायला जायचे. तो माझा क्रश होता.”
हेही वाचा – Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
पुढे शिवाली म्हणाली की, रोहितचं एक नाटक मी आठ ते नऊ वेळा मुंबईत बघितलंय. इतकं मी त्याला बघायला जायची. नोबितासाठी शिजुका कशी आहे, तसं माझ्यासाठी सावत्या आहे. शिवाली परबचं हेच बोलणं ऐकून एकच हशा पिकला. तेव्हा मजेत रोहित माने म्हणाला की, “मला दुसरं लग्न करावं लागतंय.”
हेही वाचा – एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
दरम्यान, रोहित मानेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नवं पर्व सुरू होण्याआधी त्याचं गाणं प्रदर्शित झालं होतं. ‘खेळ झाला सुरू’ असं रोहितच्या गाण्याचं नाव होतं. लवकरच तो प्रसाद खांडेकरच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळीसह हास्यजत्रेतील बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.