‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, शिवाली परबपासून ते प्रसाद खांडेकर, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकरपर्यंत सगळ्यांचाच एक मोठा चाहतावर्ग आहे. या शोमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या रील्स शेअरिंगद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करीत असतात. अशातच कल्याणची चुलबुली शिवाली परब हिने एका लोकप्रिय डान्सरबरोबर हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता, डान्सर व कोरिओग्राफर रूपेश बने याच्याबरोबर शिवाली परबने रोमॅंटिक डान्स केला आहे. शाहरुख खान, काजोल व राणी मुखर्जी अशी स्टारकास्ट असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील “कोई मिल गया” या गाण्यावर शिवाली आणि रूपेशने जबरदस्त डान्स केला आहे.

हेही वाचा… “तिला नीट उभं राहता…”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली कतरिना कैफच्या करिअरच्या सुरूवातीची आठवण

या डान्ससाठी शिवाली आणि रूपेशने मॅचिंग कपड्यांची निवड केली होती. शिवालीने सफेद रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता; तर रूपेश सफेद शर्ट, पॅन्ट आणि मॅचिंग शूजमध्ये अगदी हॅण्डसम दिसत होता.

शिवाली आणि रूपेशचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करीत लिहिलं, “बस कर पगली प्यार हो जायेगा.” तर दुसऱ्या चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “शिवाली या ग्लॅमरस लूकमध्ये खूप सुंदर दिसतेयस.” एका युजरनं “सफेद फुलपाखरू”, अशी कमेंट शिवालीसाठी केली.

हेही वाचा… “अंगारो सा…” ‘पुष्पा २’ मधील गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू, पूर्वा आणि प्रसादचा हटके डान्स, कलाकारांच्या हूकस्टेपने वेधलं लक्ष

पृथ्वीक प्रतापनंदेखील हार्टचा इमोजी शेअर करीत या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळातच या व्हिडीओला एक लाखापेक्षा अधिक व्ह्युज आले.

हेही वाचा… हातात हात अन्…, जान्हवी कपूरने शेअर केला शिखर पहारियाबरोबरचा रोमॅंटिक फोटो, अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, शिवालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. काही महिन्यांपूर्वी शिवालीचं ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसंच त्यापूर्वी ‘मॅड केलाय तू’, ‘पायल वाजे’, ‘पिरिम घावलं’, ‘मासोळी ठुमकेवाली’, ‘साजणी तुला न कळले’ या गाण्यांमध्ये शिवाली झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame shivali parab romantic dance with rupesh bane video viral dvr