छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग फक्त महाराष्ट्र आणि देशापुरती मर्यादित नसून जगभरात आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे परदेशात सातत्याने दौरे सुरू असतात. विशेष म्हणजे या कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली शिवाली आता ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखली जाते. अशा या महाराष्ट्राच्या क्रशने नुकताच ‘डान्स प्लस’च्या पाचव्या पर्वाचा विजेता रुपेश बनेबरोबर रोमँटिक डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये शिवालीने रुपेशबरोबर वेद शर्माच्या ‘Lofi Love’ गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. दोघं देखील मँचिंग कपड्यांमध्ये दिसत असून दोघांच्या सुंदर डान्स स्पेटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शिवालीच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
शिवालीचा व्हिडीओ पाहून अभिनेता पृथ्वीक प्रतापने कौतुक केलं आहे. “व्वा…क्यूट”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. याशिवाय अभिनेता आयुष्य साळुंके प्रतिक्रिया देत लिहिलं, “अगं बाई, अगं बाई…डिज्नी प्रिन्सेस”. तसंच “अति सुंदर शिवा”, “व्वा…अप्रतिम”, “मस्त”, “खूप छान परफॉर्मन्स”, “खूप मस्त शिवाली”, “तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहात?”, “क्या बात है”, “तू प्रिन्सेससारखी दिसतेय”, अशा संमिश्र प्रतिक्रिया शिवालीच्या चाहत्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता झाला बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला, “आमच्या लाडक्या…”
दरम्यान, अलीकडेच शिवालीने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. विशेष म्हणजे तिने स्वतःच्या २९व्या वाढदिवसादिवशी नव्या घरात गृहप्रवेश केला. कमी वयात स्वतःचं हक्काचं घर घेतल्यामुळे तिचं कौतुक केलं गेलं. शिवालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती बऱ्याच अल्बम साँगमध्ये दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी तिचं ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. तसंच त्यापूर्वी ‘पायल वाजे’ गाण्यामध्ये शिवाली दिसली होती. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.