‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीरांची नेहमी चर्चा होत असते. मध्यंतरी या कार्यक्रमातील काही कलाकारांच्या अफेअरच्या चर्चांना जोरदार उधाण आलं होतं. एकबाजूला प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत आणि दुसऱ्या बाजूला शिवाली परब व निमिष कुलकर्णी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण या कलाकारांनी फक्त चांगली मैत्री असल्याचं सांगून अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा शिवाली परब व निमिष कुलकर्णी प्रेमात असल्याचा चर्चांना उधाण आलं. याचं कारण ठरलं आहे, शिवाली परबने नुकतंच शेअर केलेल्या फोटोंना दिलेलं कॅप्शन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका झाली ऑफ एअर, प्रेक्षक म्हणाले, “मालिका थांबली याचं दुःख आहे…”

अभिनेत्री शिवाली परबने काही तासांपूर्वी निमिष कुलकर्णीबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत. हे फोटो शेअर करत शिवालीने लिहिल आहे, “निमिष की निषिम…सब कल्कि बातें” या कॅप्शनबरोबर अभिनेत्रीने दोघांचा नावाच्या हॅशटॅगसह लव्ह हॅशटॅग (#love) लिहिल आहे. याच हॅशटॅग लव्हमुळे शिवाली व निमिषच्या अफेअरची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे फोटो पाहून चाहते ‘शिवाली, हे खरंय?’ असं विचारू लागले आहेत.

शिवाली व निमिषच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने विचारलं, “शिवाली हे खरंय? बाबांना एकट टाकून फोटो काढलेस? आला हा ४ महिन्यानंतर?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने विचारलं, “बॉयफ्रेंड की नवरा?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने विचारलं, “कधी करताय मग लग्न?” अशा अनेक प्रतिक्रिया शिवाली व निमिषच्या फोटोंवर चाहत्यांनी दिल्या आहेत. तसेच काहींनी तर दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘आई कुठे काय करते’ला हरवल्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला टक्कर द्यायला येणार ‘ही’ मंडळी

दरम्यान, निमिषने शिवालीबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर गेल्यावर्षी एका माध्यमाशी बोलताना मौन सोडलं होतं. तो म्हणाला होता, “ही अफवा आहे. अजिबात असं काही नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत.”