‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राची क्रश’, ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून घराघरात पोहोचलेली शिवाली नाटक, चित्रपट क्षेत्रातही सक्रिय झाली आहे. त्यामुळे सध्या शिवाली खूप चर्चेत आहे. नुकतीच शिवालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे; या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री शिवाली परब सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. चित्रपटात शिवाली परब चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच संदर्भात शिवालीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा – Video: “जरी ती बोल्ड असली तरी…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं; म्हणाला…

शिवालीने ‘मंगला’ चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “आणि हे घडलं…प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, आपल्याला एक भूमिका अशी मिळावी ज्यात शीर्षक भूमिका (title role) आपण करावी आणि माझ्याबरोबर हे घडलं…इतके कमालीचे कलाकार आणि पहिलाच अनुभव शशांक शेंडे आणि अलका कुबल या दिग्गज कलाकारांबरोबर मिळाला… अपर्णा हॉसिंग तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मनापासून आभार…या सिनेमाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोस्थेटिक मेकअप…संजय सिंह यांनी खूप कमाल मेकअप केलाय…येत्या १७ जानेवारी २०२५ ला ‘मंगला’ हा आमचा चित्रपट येतोय … प्रेक्षकांना विनंती करते की मराठी चित्रपट आहे, सत्यघटनेवर आधारित आहे, नक्की सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा.”

हेही वाचा – Video: सिद्धार्थ शुक्लाच्या आईने दिवंगत लेकाचा ‘असा’ साजरा केला जन्मदिवस, सेलिब्रेशनमध्ये शहनाज गिलची अनुपस्थिती

हेही वाचा – Video: वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौलींचा भन्नाट डान्स, पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, तरुणाईला लाजवेल अशी दिग्दर्शकाची एनर्जी

‘मंगला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अपर्णा हॉसिंग यांनी केलं आहे. या चित्रपटात शिवालीसह शशांश शेंडे, अलका कुबल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. आता ती मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

Story img Loader