छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता हे कलाकार मराठीसह हिंदीत काम करताना दिसत आहेत. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील शिवाली परब आणि श्रमेश बेटकरच्या रील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री शिवाली परबने श्रमेश बेटकरबरोबरचा रील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काल, श्रमेशचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं आशा भोसले आणि कुमार सानू यांचं ‘चेहरा क्या देखते हो’ गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. दोघांच्या एक्सप्रेशनचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
“माझी आवडती जोडी…तुमची केमिस्ट्री मला खूप आवडते”, “भारी”, “खूप सुंदर”, “एकदम कडक”, “खूप मस्त…मला तुमच्या दोघांचा व्हिडीओ खूप आवडला”, “छान जोडी”, “दोघेही खूपच छान…तुमचा अभिनय सुंदर आहे”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवाली परब आणि श्रमेश बेटकरचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. अवघ्या काही तासांत ५० हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५ हजारांहून अधिकांनी लाईक केला आहे.
दरम्यान, शिवाली परब कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर लीलया सांभाळत आहे. आता तिने मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळत आहेत. याशिवाय तिचा नुकताच ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली असून तिच्यासह अलका कुबल आणि शशांक शेंडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसंच श्रमेश हास्यजत्रेत विविध भूमिकेत पाहायला मिळत आहे.