‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच प्रत्येक कलाकाराचा एक वेगळाच चाहतावर्ग तयार झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अशीच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवाली ही जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने काही फोटो शेअर केले होते; जे चांगलेच चर्चेत आले आहे.

हेही वाचा – “हृदयाचे ठोके वाढतात, मूड बदलतो अन्…”, शिल्पा शेट्टीची बहीण शमिताला सुरू झाला ‘प्री-मेनोपॉज’चा त्रास, म्हणाली…

Mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च माहितीये का? म्हणाली, “गेल्या पाच वर्षात…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Police force outside actor Rahul Solapurkars house due to security purpose
सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…

अभिनेत्री शिवाली परब ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडेच तिने ‘माझे (Mine)’ असं कॅप्शन लिहित काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती काही मुलांबरोबर वेगवेगळ्या पोजमध्ये दिसली होती. हेच फोटो पाहून चाहते ‘शिवाली हे खरंय?’ असं विचारू लागले आहेत.

एका चाहत्याने विचारलं आहे की, ‘नेमका कोणता आहे तुझा?’ तर दुसऱ्या चाहत्याने विचारलं, ‘शिवाली हे खरंय? थांब निमिष आणि बाबांना सांगतो.’ तसेच तिसऱ्या चाहत्याने ‘शिवाली हे खरं आहे?’ असंच विचारलं आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

दरम्यान, हास्यजत्रेचे जे चाहते आहेत, त्यांना हे माहितीच असेल की, शिवाली हे खरंय? हा एक लोकप्रिय डायलॉग आहे. शिवाली, समीर चौघुले आणि निमिष यांच्या स्कीटमध्ये तिला अशा प्रकारे विचारलं जातं. शिवालीचे स्कीटमधले बाबा म्हणजेच समीर चौघुले असा प्रश्न तिला विचारत असतात. म्हणून चाहत्यांनी देखील मजेत हे फोटो पाहून ‘शिवाली हे खरंय?’ असं विचारलं आहे.

Story img Loader