‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील कलाकार प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अभिनेत्री शिवाली परबलाही हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळाली. या शोमुळे शिवाली घराघरात पोहोचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा शिवाली तिचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही शिवाली पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. शिवालीने नुकतंच हिंदू नववर्षातील पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला. गुढीपाडव्यासाठी शिवालीने खास लाल रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला होता. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

हेही वाचा>> आतिफ अस्लमला कन्यारत्न, रमजानच्या मुहूर्तावर शेअर केला पहिला फोटो, लेकीचं नाव ठेवलं…

हेही वाचा>> “इंग्रजी चालणार नाही, मराठीत…” चाहत्याच्या कमेंटवर प्रियदर्शनी इंदलकरचं उत्तर, म्हणाली “हे तुम्ही…”

शिवालीचा इंडो वेस्टर्न लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांना शिवालीचा हा नवा लूक आवडला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. सध्या ती ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटातही झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame shivali parab troll for wearing paithani dress photo kak