छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मागील कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतं आहे. ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत, त्याप्रमाणे या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला. या दौऱ्यावरील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर कलाकारांनी शेअर केले होते. अजूनही कलाकार ऑस्ट्रेलियातील मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीच्या नवऱ्याने आज खास मच्छीचा बेत केला होता. याचा व्हिडीओ या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा नवरा सुमित लोंढेने आज शनिवार स्पेशल म्हणून मच्छीचा बेत केला होता. त्याने स्वतःच्या हाताने बायकोसाठी खास मच्छी फ्राय केली होती. याचा व्हिडीओ वनिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि लिहिलं आहे, “सुगरण नवरा.”
हेही वाचा – कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
दरम्यान, गेल्या वर्षी २ फेब्रुवारीला वनिता खरात लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेऊन तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोजक्याच आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थित वनिता व सुमितचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता. एका रिसॉर्टमध्ये वनिताचं लग्न झालं होतं. वनिताचा नवरा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.