‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सपत्पदी घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. आता सुमित लोंढेने वनितासाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

वनिता आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. तिने तिच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. त्याबरोबर तिने पारंपरिक दागिनेही परिधान केले होते.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video

तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता. त्यानंतर या दोघांनी रिसेप्शनला साडी आणि ब्लेझर असा वेस्टर्न लूक केला होता. यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर सुमीत हा निळ्या रंगाच्या सूट-बुटात पाहायला मिळाला. आता सोशल मीडियावर वनिता व सुमितच्या लग्नाच्या काही खास क्षणांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

यावेळी सुमित लोंढेने वनितासाठी खास उखाणा घेतला. “तू दिसतेस फार सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार आहे माझ्या गाडीवर”, असा उखाणा सुमितने वनितसााठी घेतला. त्याचा हा उखाणा ऐकून वनिताने अग्गबाई असं म्हटलं. त्याच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : Video : वनिता खरातच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ कलाकारांचा खास डान्स, ‘दिलबरो’ गाणं लागताच डोळ्यात तरळले पाणी

दरम्यान वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader