‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमीत लोंढेशी २ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. वनिता व सुमितच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. याच निमित्ताने वनिताने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नातील काही खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांपासून ते लग्नातील धामधूम, मंगलाष्टकं, हळदी व संगीत कार्यक्रम असे सुमित व वणीच्या लग्नातील क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. लग्न लागल्यानंतर वनिता व सुमितने एकमेकांना लिप टू लिप किसही केलं. त्याची झलकही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> हृदयविकाराचा झटका येण्याआधी सुश्मिता सेनला झालेला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाली “आठ तासांनी मला…”

हेही वाचा>> Video: डायनिंग टेबलच्या कव्हरपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, नेटकरी म्हणाले “कंडोम…”

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या व गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून खास मराठमोळा लूक केला होता.तर सुमितही फेटा बांधून राजबिंडा दिसत होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कलाकरांनीही वनिताच्या लग्नाला हजेरी लावली होती. वनितासाठी हास्यजत्रेतील कलाकारांनी खास डान्सही केला होता. वनिता व सुमितच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

हेही वाचा>> Video: “१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर…” चाहत्यांच्या घोषणेनंतर अभिनेत्रीला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांतही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात तिने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. वनिता गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सरला एक कोटी’ या मराठी चित्रपटातही विशेष भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat lip kiss with husband sumit londhe shared special video after wedding month anniversary kak