‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच सुमितच्या घरी सत्यनारायणची पूजा पार पडली. यावेळी वनिताच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

वनिता खरात- सुमित लोंढे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्या दोघांनी गुरुवारी २ फेब्रुवारीला सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. यानंतर शनिवारी ४ फेब्रुवारीला सुमितच्या घरी सत्यनारायणाची पूजा पार पडली. या पूजेवेळी त्या दोघांनी पारंपारिक लूक केला होता.
आणखी वाचा : Video : “तू दिसतेस फार सुंदर साडीवर…” सुमितने वनिता खरातसाठी घेतला खास उखाणा

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar
जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…

यावेळी वनिताने हिरव्या रंगाची साडी, हातात चुडा, गळ्यात पारंपारिक दागिने असा मराठमोळा लूक केला होता. तर सुमीतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लेहंगा परिधान करत त्यावर पैठणी शेला परिधान केला होता. या लूकबरोबर वनिताने परिधान केलेल्या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वनिताने परिधान केलेल्या मंगळसूत्राचे डिझाईन फारच हटके आहे.

दरम्यान सत्यनारायण पूजेच्यावेळी वनिताने खास उखाणाही घेतला. यावेळी तिने खास पुजेसाठी एक उखाणा तयार केला होता. “आमच्या कोकणात फेमस आहे कापा आणि बरका फणस, आमच्या कोकणात फेमस आहे कापा आणि बरका फणस, सुमित रावांचं नाव घेते आज आहे पूजेचा दिवस”, असा उखाणा यावेळी वनिताने घेतला. तिचा हा उखाणा ऐकून सर्व उपस्थित लोकांनी तिचे कौतुक केले.

आणखी वाचा : Vanita Kharat Wedding : लग्नात रंगली उखाण्यांची धमाल, पतीने घेतलेल्या उखाण्याला उखाण्यानेच उत्तर देत वनिता म्हणाली, “कबीर सिंगच्या नादात…”

दरम्यान वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader