छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग फक्त महाराष्ट्र व देशातच नाही, तर जगभरात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करतं आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा घराघरात पोहोचला आहे आणि प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशीच एक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार म्हणजे वनिता खरात.

अभिनेत्री वनिता खरातने आपल्या अभिनयाची छाप मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उमटवली आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. आता वनिताची एका लोकप्रिय मालिकेत जबरदस्त अशी एंट्री होणार आहे.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत येणार नवं वळणं; मुक्ता-सागरच्या मैत्रीच्या नात्याची होणार सुरुवात

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या लोकप्रिय मालिकेत वनिता खरात झळकणार आहे. एका महत्त्वाच्या भूमिकेत वनिता पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘सन मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वनिताचा डॅशिंग अंदाज दिसत आहे.

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात

हेही वाचा – ‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….

दरम्यान, वनिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने यापूर्वी बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ती आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातही झळकणार आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वनितासह गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने अशी तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे.

Story img Loader