सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिने प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठीसह हिंदी चित्रपटात स्वत:च्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून वनिता खरातकडे पाहिले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे ती कायमच चर्चेत असते. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिकेमुळे आजही अनेकांच्या ती लक्षात आहे. रंग, रुप किंवा देहरचनेवर या सर्व मर्यादा तोडत तिने अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच वनिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली
वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे “साथी ” असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच #milgayahumkosathimilgaya #partner #love #sumeetvani #specialperson #myman #firstphoto असे अनेक हॅशटॅगही तिने दिले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेते समीर चौगुले यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमित… खूप खूप प्रेम, असे समीर चौगुले म्हणाले. तर नम्रता संभेराव हिनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून सुमितने त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमित, अशी कमेंट नम्रताने केली आहे. त्यावर सुमितने खूप खूप धन्यवाद नमा ताई, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तर ओंकार राऊत याने त्यांच्या या फोटोंवर अनेक कमेंट केल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमित, असे ओंकारने म्हटले आहे. त्यावर सुमितने धन्यवाद असे म्हटले आहे. त्याबरोबर ओंकारने पहिला फोटो अशीही कमेंट केली आहे. त्यावर सुमितने प्रतिक्रिया देताना फक्त हार्ट इमोजी शेअर केला आहे.
आणखी वाचा : “हा चित्रपट…” ‘कांतारा’ पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. ते लवकरच एका नात्याच्या बंधनात अडकताना दिसणार आहेत. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांचे अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.