महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मराठीसह हिंदी चित्रपटात स्वत:च्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून वनिता खरातकडे पाहिले जाते. सध्या वनिताची लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या लग्नाची तारीखही सांगितली होती. त्यापूर्वी वनिताने प्री-वेडिंग शूटचा खास फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिताने काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. त्या दोघांनी दिवाळीचा सणही एकत्र साजरा केला होता. आता लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांनी प्री-वेडींग फोटोशूट केलं आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लग्नाची तारीख समोर, म्हणाली…

वनिताने तिचा पती सुमित लोंढेबरोबर प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे. यात वनिताने सुमितला लिप किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेत आली आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शननेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल…

गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे। असे कॅप्शन वनिताने या फोटोला दिले आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. तर काही कलाकारांनी यावर कमेंटही केली आहे. अभिनेत्री स्पृहा वरद, नम्रता संभेराव, स्नेहल शिदम या कलाकारांनी यावर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केल्या आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी वनिता आणि सुमितला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वनिता आणि सुमित येत्या २ फेब्रुवारी २०२३ ला लग्न करणार आहेत. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat share liplock photo with sumit londhe see caption nrp