अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं. तर आता गुढीपाडवानिमित्त तिने तिचा नवीन वर्षाचा संकल्प शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिताने फेब्रुवारी महिन्यात सुमित लोंढेशी लग्न केलं. तर लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे हा गुढीपाडवा तिच्यासाठी नक्कीच खास आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने खास संकल्प केला आहे. तिने ‘सकाळ’ला नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने केलेला हा संकल्प सर्वांना सांगितला आहे.

आणखी वाचा : मराठी, हिंदीपाठोपाठ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला खुणावतंय टॉलिवूड; म्हणाली, “मला दक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

वनिता म्हणाली, “येणाऱ्या वर्षात मला खूप काम करायचंय. खास करून खूप झाडं लावायची आहेत. नवीन वर्षात माझा एक नवीन चित्रपट येणार आहे. त्याची माहिती मी सोशल मीडियावरून प्रेक्षकांना देईनच आणि त्याचसोबत एक नवीन नाटक सुद्धा करायचा माझा विचार आहे.”

हेही वाचा : Video: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ; म्हणाल्या, “सर्वाधिक आनंद याचा होता की…”

दरम्यान वनिता खरात लवकरच रोहित शेट्टीच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर यात वनिताचीही झलक दिसली. वनिता रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार असल्याने तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat shared her gudhipadwa resolution rnv