‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री वनिता खरात हास्यजत्रेमुळे घराघरांत पोहोचली. तिने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली आणि मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच वनिताने इन्स्टाग्रामवर जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हेही वाचा : ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात ‘जुळलं’, बॉयफ्रेंडबरोबर शेअर केले फोटो

वनिता खरातने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केलं. अभिनेत्रीचं सासूबाईंशी फारचं सुंदर नातं आहे. तिच्या सासूबाईंनी तिच्यासाठी खास जेवण बनवलं होतं. याचा फोटो वनिताने सोशल मीडियावर शेअर करत सासूबाईंना धन्यावाद म्हटले आहे.

हेही वाचा : “सहनशील, सतत अत्याचार होणाऱ्या भूमिका…”, अभिनेत्री तेजश्री प्रधानचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, भजी असे सगळे चमचमीत पदार्थ दिसत आहेत. याला कॅप्शन देत अभिनेत्रीने “सासूबाईंचं प्रेम, लव्ह यू मम्मे” असे म्हटले आहे. यापूर्वी वनिताने सासूबाईंच्या हातच्या लुसलुशीत पुरणपोळ्यांचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता.

हेही वाचा : ‘प्यार का पंचनामा’मध्ये नुसरत भरुचाने बिकिनी घालण्यास दिलेला नकार, कारण…

दरम्यान, वनिताने नाटकांपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे, ‘कबीर सिंग’, ‘सरला एक कोटी’ चित्रपटातील भूमिका आणि हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. यावर्षी २ फेब्रुवारीला वनिता आणि सुमित विवाहबंधनात अडकले. वनिताचा नवरा सुमित उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. सध्या दोघंही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

Story img Loader