‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. विनेदाची उत्तम जाण असणारी वनिता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. अभिनयाचा ठसा उमटवत वनिताने मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. वनिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिताने नुकतंच ‘संपूर्ण स्वराज’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना वनिताने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. वैयक्तिक आयुष्य ते कलाविश्वातील अनेक गोष्टींबाबत वनिताने या मुलाखतीत खुलासा केला. “तुला आवडणाऱ्या पाच चित्रपटांची नावं सांग,” असा प्रश्न वनिताला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर वनिताने “विकी कौशलचा मसान चित्रपट आवडतो,” असं उत्तर दिलं.

हेही वाचा>> ड्रग्ज तस्करी प्रकरणात UAEमध्ये अटक झालेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कोण?

वनिता खरात पुढे म्हणाली, “गँग्स ऑफ वासेपूर आणि मिर्झापूर या चित्रपटांमध्ये काम करायला मला आवडलं असतं. वास्तववादी चित्रपट मला खूप आवडतात. नीट निटके चित्रपट मला आवडत नाहीत. म्हणून अनुराग कश्यप हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. जे आहे ते आणि तसं अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटांतून दाखवतो. अशा चित्रपटांत काम करायला मला आवडेल.”

हेही वाचा>> लग्नासाठी कसा मुलगा हवा? समृद्धी केळकरने वाचला अटींचा पाढा, म्हणाली “मला कुत्र्यांवर…”

वनिता खरात सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. वनिताने मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कबीर सिंग चित्रपटात वनिताने अभिनेता शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat talk about gangs of wasseypur and mirzapur kak