विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून विनोदी स्किट करत त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. आतापर्यंत त्यांच्या अनेक स्किट्समध्ये त्यांच्या शरीरयष्टीवरून विनोद केले गेले. अनेकदा यावरून त्यांना ट्रोलही केलं जातं. आता त्यांच्या जाडेपणावरून स्किटमध्ये विनोद करण्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये फटकारलं, टोमणे खावे लागले…” विशाखा सुभेदार यांनी सांगितलं कार्यक्रम सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या, “स्किट झाल्यानंतर…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “बॉडी शेमिंगबद्दल, माझ्या जाडेपणाबद्दल किंवा माझ्यासारख्या बायकांच्या भावना दुखावल्या जातील असं कोणी काही वक्तव्य केले तर मी स्वतःच ढाल म्हणून उभी असते. मी त्यांना सांगते की हे खोडा. हे योग्य नाही. पूर्वी मला कोणी जाडी म्हटलं तर मला खूप वाईट वाटायचं. आता मी जाडी आहे, लोकांना जाडी दिसत आहे तर तुम्ही त्याला आणखीन ठळक कशाला बनवता? मी जाडी आहे ते लोकांना दिसतंय. पण जाडेपणावरून तुम्ही काही वेगळं बोललात तर मला आवडतं. जाडेपणाची परिभाषा सांगायला तुम्ही जर वेगळा काही शब्द वापरला किंवा वेगळं वाक्य वापरलं; जे ऐकून खरंच हसू आलं की हे काहीतरी वेगळं आहे, तर मी खरंच त्या लेखकाला आणि कलाकाराला मानेन. पण जाडीला जाडी म्हणण्यात काय अर्थ आहे! तिथे तेव्हा मी बॉडी शेमिंगला नाही म्हणायचे.”

हेही वाचा : “नवीन मालिका खूपच वाईट आणि…” नेटकऱ्याच्या स्पष्ट प्रतिक्रियेवर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

त्या उदाहारण देत त्या म्हणाल्या, “हास्यजत्रेत समीर मी सोफ्यावरून उठल्यावर म्हणाला की, ‘त्या सोफ्याला श्वास घेतला’ तर याच्यात काहीतरी कल्पकता आहे. यात काहीतरी गंमत आहे. मला काही फरक पडत नाही. तो मला नाही तर त्या सोफ्याला बोलला असं ते होतं. तर अशा विनोदालाही मी त्याप्रमाणे रिॲक्ट करून पुढे जायचे. स्किटमधील भूमिकेप्रमाणे माझी प्रतिक्रियाही बदलायची. त्यामुळे बॉडी शेमिंगच्या विनोदावरही मी माझ्या पद्धतीने ते विनोद फटकारले आहेत.” तर आता विशाखा सुभेदार यांच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar opens up about body shaming jokes rnv
Show comments