महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदार ही सध्या तिच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. विशाखा सुभेदारने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
विशाखा सुभेदार ही इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. ती कायमच विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये ती ‘जरुरत थे हम या जरूरी है तुमको’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने फारक सुंदर कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा-“सगळ्या पुरुषांना एकच सांगायचं आहे की…” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट चर्चेत
विशाखा सुभेदारची पोस्ट
“जरुरत, गरज …किती खरी किती खोटी? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच की आपल्याला उशिरा का होईना..गरज सरो वैद्य मरो अशाच्या समवेत फार काळ राहू नये आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.”
विशाखा सुभेदारने या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चाहते ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे याचा अंदाज लावताना दिसत आहेत. अनेकांनी विशाखाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या या कॅप्शनचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा- विशाखा सुभेदार यांनी सांगितला मालिका आणि कॉमेडी शोमधील कामाचा अनुभव, म्हणाल्या “प्रचंड स्पीड…”
दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.