‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. सिंधुताईंच्या बालपणाची गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार आहे, हे जाहीर झाले आहे. बालपणीच्या सिंधुताई म्हणजेच चिंधीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारणार आहे. तर सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे यांच्या भूमिकेत अभिनेते किरण माने दिसणार आहे.

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे कलाकारांनी फोटो केले शेअर

‘सिंधुताई माझी माई’मधून सात वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रिया बेर्डे मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत. त्या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार आहे. योगिनी चौक ही सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेतून योगिनी सुद्धा बऱ्याच काळाच्या विश्रांती पुनरागमन करत आहेत.

हेही वाचा – पुरुष वर्गासाठी खास ऑफर; फक्त ‘इतक्या’ रुपयात पाहता येणार ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता

योगिनी चौक हिनं नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही क्षेत्रात काम केलं आहे. ती ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाची विजेती आहे. आता ती ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

Story img Loader