अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळेच त्याच्या चाहत्यावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच प्रसाद आता मराठी चित्रपटांमध्येही रमला आहे. ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करत आहे. पण आपल्या कामामधून मिळालेल्या वेळेमध्ये तो कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. आताही त्याने आपल्या लेकाबरोबरचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – “दोन वेळा आत्महत्या करण्याचा…” समीर चौगुलेंना चाहतीने भर कार्यक्रमामध्ये दिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?
प्रसाद सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. तो लेक श्लोकबरोबरचे अनेक गंमतीशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. आता तर चक्क तो लेकाबरोबर मालवणी जत्रेमध्ये पोहोचला होता. यादरम्यानचाच त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
प्रसाद गेली २५ वर्ष या तो राहत असलेल्या ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या मालवणी जत्रेमध्ये जातो. त्याने लेकाबरोबर पाळण्यामध्ये बसलेला व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “लहानपण देगा देवा… गेली २५ वर्षं मालवणी जत्रेत वेळ काढून जातोय. जत्रेत लहानपणी पश्या बाबांसह जायचा. आता श्लोक ‘पश्या बाबा’ सह जत्रेत जातो. जत्रेतील राईड्समधील ड्रॅगन ट्रेनमधून श्लोकसह प्रवास.”
प्रसादच्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे. तसेच ड्रॅगन ट्रेनमध्ये बसलेला प्रसाद व श्लोक अगदी मनसोक्त एन्जॉय करताना दिसत आहेत. बेस्ट वडील-मुलाची जोडी, खूप सुंदर व्हिडीओ अस त्याच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.