‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकाराची आज सगळीकडे चर्चा रंगताना दिसते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा तसेच यामधील कलाकारांच्या चाहता वर्गामध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. कार्यक्रमामधील सगळ्यात अतरंगी व सुप्रसिद्ध कलाकार समीर चौगुले तर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या चाहतीचा त्यांना आलेला अनुभव सांगितला. तो ऐकून अक्षरशः तुमच्याही अंगावर काटा येईल.

आणखी वाचा – Video : आधी मांडीवर बसली, त्याने घट्ट मिठी मारली अन्…; ‘बिग बॉस’च्या घरात गौतम-सौंदर्याचा उघडपणे रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एका कार्यक्रमाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सर्वेसर्वा सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांच्याबरोबर समीर यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते प्रेक्षकांकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला मिळणारा प्रतिसाद याबाबत बोलत होते. तसेच त्यांनी सांगितलेला एक प्रसंग खरंच थक्क करणारा होता.

ते म्हणाले, “मी एका कार्यक्रमात गेलो होतो. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने माझ्या हातात चिट्ठी दिली. माझ्याबरोबर त्या महिलेने फोटो वगैरे काही काढला नाही. फक्त ती म्हणाली ही चिठ्ठी तुम्ही घरी जाऊन वाचा. मी घरी जाऊन ती चिठ्ठी वाचली.”

आणखी वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूर झाले आई-बाबा अन् चर्चेत आला करण जोहर, मीम्स पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

पुढे ते म्हणाले, “तर त्यामध्ये तिने लिहिलं होतं की, माझ्या नवऱ्याने चार महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर महिन्यात आत्महत्या केली. त्यानंतर मी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या काळामध्ये फेसबुकला मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा तीन मिनीटांचा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर मी इतकी खळखळून हसले की मी पूर्ण स्किटच पाहिलं. मला याचं एवढं वेड लागलं की मी युट्यूबवरील या कार्यक्रमाचे सगळे भाग पाहिले. त्यानंतर मला खूप फ्रेश व सकारात्मक वाटलं. आज मी आत्महत्येचा विचार माझ्या मनातून दूर केलेला आहे.” खरं तर समीर आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमच्या कलाकारांच्या कामाची ही पोचपावती आहे.

Story img Loader