‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आज लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम म्हणजे टेन्शनवरचं उत्तम औषध आहे. या कार्यक्रमामधील कलाकार मंडळींचा चाहतावर्ग तर फार मोठा आहे. याच कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता समीर चौगुले. समीर यांच्या विनोदाचा अचूक टायमिंग, मंचावर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करतं. त्यांनी आजवर मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आता ते नव्या कामाला लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – वयाच्या ५६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने ३३ वर्षाने लहान मुलीशी गुपचूप केलं दुसरं लग्न, कारण…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून काही दिवसांसाठी समीर यांनी ब्रेक घेतला असल्याचं सध्या दिसत आहे. कारण ते आता परदेशात रवाना झाले आहेत. समीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे विमानामधील एक फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

समीरने विमानामध्ये सेल्फी काढत तो फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्याने म्हटलं की, “मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मी येतोय.” समीर यामध्ये फारच खूश दिसत आहेत. पण ते परदेशामध्ये जाण्यामागचं कारणही तिककंच खास आहे.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विश्वास सोहनी नाट्यमहोत्सवास मेलबर्नमध्ये असणार आहे. या नाट्यमहोत्सवासाठीच समीर ऑस्ट्रेलियाला गेला आहे. आनंद इंगळे, अंकुश चौधरी, निर्मिती सावंत यांसारख्या मंडळींनी या नाट्यमहोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या कलाकारांचे व्हिडीओही शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actor samir choughule travel to australia share photo on instagram see details kmd