कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आली. तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते. चक्क अभिनेते जॉनी लिवरदेखील तिचे फॅन आहेत. नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. ती साकारत असलेलं लॉली हे पात्र तर सुपरहिट आहे. नम्रताची सासूही तिच्या या पात्राची चाहती आहे.
आणखी वाचा – करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ‘एबीपी माझा’ वाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी नम्रतानेही सेटवरच्या अनेक गंमती-जमती सांगितल्या. यावेळी तिला लॉली या पात्राबाबत विचारण्यात आलं. तसेच लॉली हे पात्र पाहून कुटुंबियांची प्रतिक्रिया काय असते याबाबतही नम्रताने सांगितलं.
ती म्हणाली, “माझी सासूनेच लॉलीच स्किट पाहिलं आणि म्हणाली अरे ते तू केलेल लॉलीचं स्किट काय कमाल झालं. हे ऐकल्यावर मला खूप छान वाटतं. जेव्हा पुरुषांच्या वाट्याला अशाप्रकारच्या भूमिका येतात तेव्हा त्या भूमिका ते उत्तमरित्या निभवतात. आज मीही अशाप्रकारचं पात्र साकारत आहे. तर प्रेक्षकांनी ते स्वीकारलं पाहिजे. काही प्रेक्षकांनी हे पात्र उत्तमरित्या स्वीकारलं आहे.”
आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरेचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक
“काही प्रेक्षकांनी बहुदा लॉली या पात्राचा स्विकार केलाही नसेल. कारण प्रत्येकाची मतं वेगळी असतात. पण लॉली साकारत असताना मला काही वावगं वाटत नाही. कारण ५ वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत लॉली हे पात्र लोकप्रिय ठरलं आहे. हाच माझा आनंद आहे आणि हिच माझ्या कामाची पोचपावती आहे असं मला वाटतं.” खरंच नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेले पात्र अगदी लोकप्रिय आणि चर्चेचा विषय ठरतात.